‘ठकीशी संवाद’ नाटकातून उदारमतवादावर प्रकाश : ‘प्रिसिजन गप्पा’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर, १८ –
रंगभूमी म्हणजे कलेचे अभयारण्य आहे. कलेची प्रयोगशाळा आहे. नाटक म्हणजे मोठ्या माणसांची भातुकली असते, असे मत अभिनेता सुव्रत जोशी यांनी व्यक्त केले. प्रिसिजन फाउंडेशन तर्फे आयोजित प्रिसिजन गप्पा कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

प्रारंभी प्रिसीजन फाउंडेशनतर्फे आयोजित प्रिसीजन गप्पा कार्यक्रमाच्या १६ व्या पर्वाचे उद्घाटन सतीश आळेकर यतिन शहा, डॉ सुहासिनी शहा, रवींद्र जोशी,अनुपम बर्वे, सुरत जोशी गिरीजा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिशय संवाद या नाटकाचा प्रयोग प्रिसिजन फाउंडेशन तर्फे प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आला होता . प्रेक्षकांनीही या नाटकाला चांगली दाद दिली.
यावेळी सुव्रत जोशी यांनी रंगभूमी व नाटकाबद्दल बोलताना, रसिक नाटक चांगले ऐकत बघत असतात त्यावेळी शब्दांचे नवे अर्थ आम्हालाही समजतात. सतीश सरांची नाटकांविषयी व्याख्या वेगळी आहे. नाटक म्हणजे मोठ्या माणसांची भातुकली असते असे सांगितले.

अभिनेत्री गिरिजा ओक यांनी सध्या आयडॉलॉजीपेक्षा जास्त सध्याच्या वातावरणात स्वतःचे मत मांडण्याची अथवा भूमिका घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. नाटक या माध्यमावर खूप प्रेम आहे. मी आळेकर सरांची नाटके बघत मोठी झाले. त्यांना नाही म्हणणे मूर्खपणाचे ठरले असते म्हणून हे नाटक केल्याचे सांगितले.
नाटकाचे लेखक सतीश आळेकर यांनी नाटकाबद्दल बोलताना परिस्थितीतील बदलांना उजाळा दिला. राजकीय संस्कृती १९९० नंतर बदलायला लागली. त्यांनतर आताच्या परिस्थितीकडे वयाच्या ७५ व्या वर्षी नाटक लिहून झाल्याचा आनंद आहे. दिल्ली येथे आयआयसी येथे फिरताना करगोट्याबद्दल विचार आला.
करगोट्याबद्दल लिहिताना घरातील वातावरण राजकीय पार्श्वभूमी होती. त्यानंतर सगळं बदलत गेले. राजकारणातील उदार मतवादपणा आधीचा सध्या राहिलेला नाही, अशी खंत व्यक्त केली. नाटक लिहणे म्हणजे भानावर राहून स्पेस रंगवण्यासारखे आहे. लेखक म्हणजे तो रंगवणारा व शब्दप्रसंग कालवणारा आहे. असे आळेकर सर म्हणाले.
मनात जे साचत ते मी कागदावर उतरवतो. ते आवडलेच पाहिजे असा माझा कधीही आग्रह नाही, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले.