सोलापूर : शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. याबाबत आम्ही हॉटेल रेस्टॉरंट तसेच गर्दीची ठिकाणे यावर कडक निर्बंध आणणारा असून सध्या तरी लॉकडाउन शक्यच नाही अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येस न्यूज मराठीशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी दुपारी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरां समवेत बैठक घेतली सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाबत चाचण्या वाढवा तसेच रुग्णांच्या संपर्कातील संशयितांवर लक्ष ठेवा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लॉक डाऊन करणार नाही मात्र आणखी एक दोन दिवसांनी शहर जिल्ह्यातील हॉटेल दुकाने तसेच त्यांच्या वेळा या संदर्भात आम्ही कडक पावले उचलत आहोत याबाबतचा ड्राफ्ट पालकमंत्र्यांना पाठवण्यात येईल त्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर हे निर्णय जाहीर होतील मात्र सध्यातरी कम्प्लीट लॉकडाउन शक्यच नाही असे जिल्हाधिकारी म्हणाले वाहनांमध्ये प्रवासी संख्या वर देखील निर्बंध आणले जात असून जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई केली जाईल नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.