भारताच्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी वंदे भारत एक्सप्रेस चालवून एक नवीन इतिहास निर्माण केला आहे. भारतच नाही तर पूर्ण आशिया खंडातील पहिली महिला लोको पायलट म्हणून सुरेखा यांनी सोलापूर-CSMT पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस चालवून एक नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यांचे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवर भव्य स्वागत करण्यात आले.
1988 साली जन्मलेल्या सुरेखा यादव या महाराष्ट्रातील सातारा गावच्या रहिवाशी आहेत. त्यांनी भारतचं नाही तर पूर्ण आशियाची पहिली महिला लोको पायलट होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या उपलब्धीबद्दल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्काराने गौरान्वित करण्यात आलेले आहे. सुरेखानी
8 मार्च 2011 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डेक्कन क्वीन नामकी रेल्वे पुणे ते सीएसएमटी मुंबई पर्यंत चालविली होती. ज्यावेळी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी 2000 साली पहिल्यांदा लेडीज स्पेशल लोकल रेल्वे सुरु केली होती त्यावेळी त्या चालक दलात स्वतः सुरेख यादव समाविष्ट होत्या.
13 मार्च 2023 रोजी वंदे भारत एक्सप्रेस चालविल्याबद्दल त्यांना सन्मानित सुद्धा केलं गेलं होतं. जी वंदे भारत एक्सप्रेस सुरेख यादव यांनी चालविली होती ती सोलापूर ते सीएसएमटी हि होती आणि वेळेपेक्षा ५ मिनिटे आधी ती सीएसएमटी पोहोचली होती.