मार्कंडेय रुग्णालय येथे-चंडक परिवारातर्फे देण्यात आलेल्या देणगीतून रुग्णालयचे व चंडक ट्रस्टचे माजी चेअरमन डॉ गिरीब लोणकरण चंडक यांच्या नावाच्या ‘बालरोग अतिदक्षता विभागाच्या’ उद्घाटन प्रसंगी मा. ना माजी मंत्री विजयकुमारजी देशमुख यांनी सांगीतले. चंडक परिवाराने सोलापुरात अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच आपला मदतीचा हात पुढे ठेवला म्हणून सोलापूरात आज अनेक शाळा, कॉलेज, दवाखाने, विहरी, पाणपोई, उद्याने, बालोद्यान, सभागृह वगैरेंची उभारणी झाली. चंडक परिवाराकडून सोलापूरकरांनी देण्याचा हात घ्यावा असेही त्यांनी प्रतिपादन केले. डॉ. गिरीष चंडक यांची पुर्वभागात, रुग्णांची केलेली सेवा आजही लोक आठवतात हे ही त्यांनी आवर्जून सांगीतले. मार्कंडेय रूग्णालयाबद्दल गौरवोद्गार काढतांना त्यांनी सांगीतले की हे रुग्णालय रुग्णांची कमी पैशात सेवा करण्यात जास्त धन्यता मानते म्हणून हे सर्वांच्या पसंदिस उतरलेले रूग्णालय आहे.
मार्कडेय रुग्णालयातर्फे डॉ. माणीक गुर्रम यांनी डॉ. चंडक यांच्या मार्कंडेय रुग्णालयात केलेल्या प्रदिर्घ सेवेचा उल्लेख करतांना त्यांच्या हसतमुख सभावामुळे रुग्ण त्यांचे आजारच विसरत असे सांगीतले . रामसुख संतोकीराम चंडक ट्रस्टचे चेअरमन किशोर चंडक यांनी सर्वांचे स्वागत करतांना चंडक परिवाराची व ट्रस्टची माहिती दिली. या प्रसंगी पी. आर दमाणी, ब्रिजमोहनजी पोफळीया, डॉ. माधवी रायते, कवी मारुती कटक धोंड, प्रकाश बंग (पुणे), उज्वल लाहोटी, उमेश लाहोटी (मुंबई), रवि सारडा (अहमदनगर) किशोर मंडोवरा (जळगाव) राजेश चंडक (बेंगलोर), तुळशीदास भुतडा व कालीदास जाजू यांच्यासह समाजातील मान्यवर, बिल्डर्स, वकिल, साहित्यिक मोठ्या संख्येने हजर होते. सुत्र संचालन व आभार प्रदर्शन के के तिवारी यांनी केले.