तेलुगु भाषिक मतदार भाजपच्याच बाजूने
प्रभाग क्रमांक ९ येथे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं.
ही पदयात्रा रविवार पेठ भद्रावती पेठ जोड बसवण्णा चौक वडार गल्ली विनोबा भावे झोपडपट्टी आदी परिसरात मोठ्या जोशात निघाली. फटाक्यांची आतिशबाजी ढोल ताशाच्या निनाद आणि माता भगिनींनी औक्षण करून स्वागत करण्यात आले आमदार देशमुख यांचे स्वागत केले.
प्रभाग क्रमांक नऊ हा शहर उत्तर आणि मध्य या दोन्ही मतदारसंघांमध्ये येतो. हा मतदारसंघ 80 ते 90 टक्के भाग संपूर्ण तेलुगु भाषकांचा आहे. तेलगू भाषिक मतदार हे भारतीय जनता पक्षाचे पारंपारिक मतदार असून आमदार विजयकुमार देशमुख यांना एक लाख मतांनी विजय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे भाजपचे दत्तू पोसा आनंद बिरू यांनी सांगितले….
या भागात कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने असून केंद्र आणि राज्य शासनाचे सर्वजण चे लाभधारक बहुसंख्येने आहेत. आमदार देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असे नागेश सरगम आणि सिद्धार्थ मनजेली यांनी सांगितले….
या पदयात्रेत भाजप महिला आघाडी अध्यक्ष विजया वड्डेपल्ली,माजी नगरसेविका रामेश्वरी बिररू, राधिका पोसा, मेघनाथ हेमल, शिवानंद पाटील, शेखर इगे, गंगाधर बंडगर, नागनाथ बापट, नितीन बिच्चल, बजरंग कुलकर्णी, प्रकाश गाजूल, शारदा चरकूपल्ली, अमोल धडके प्रतीक आडम, श्रीनिवास जोगी, नागनाथ पल्लाटी, विमल कन्ना आधी सहभागी होते….