येस न्युज मराठी नेटवर्क : प्र. संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालि विभागा मार्फत आज दि. 19/09/2022 रोजी जागतिक पालि भाषा गौरव दिना निमित्त ‘आधुनिक भाषा शिक्षण साहित्य क्षेत्रात पालि भाषा अभ्यासाचे महत्व:’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने (गुगल मिटद्वारे) व्याख्यान आयोजित केले होते. 17 सप्टेंबर हा दिवस भन्ते देवमित्त अनागारिक धम्मपाल यांचा जन्मदिन ‘जागतिक पालि भाषा गौरव दिन’ म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
या अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ अंतर्गत भाषा व वाङमय संकुलातील पालि विभागाने या दिनाचे औचित्य साधून दि. 19 सप्टेंबर रोजी डॉ. प्रफुल्ल गडपाल सहायक प्राध्यापक केंद्रीय संस्कृत विद्यापीठ लखनऊ. यांनी ‘आधुनिक भाषा शिक्षण साहित्य क्षेत्रात पालि भाषा अभ्यासाचे महत्व:’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने (गुगल मिटद्वारे) व्याख्यान दिले. व्याख्यानातून पालि भाषा आणि पालि भाषेचे महत्व या बद्दल विशेष मार्गदर्शन व माहिती सांगितली. या व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. उत्तम कांबळे यांनी केले आणि विजयकुमार झुंबरे यांनी अथिती परिचय करून दिला.या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा व वाङमयचे प्र.संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून पालि साहित्यातील पालि भाषा आणि त्या साहित्यातून मानवी जीवनावर रुजवणारी मुल्ये यांचे लेखन आहे. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासातून लोकांसमोर असे दिशा देणारे साहित्य आले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या व्याख्यानास मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालि साहित्य संदर्भात महत्वपूर्ण माहिती घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.उत्तम कांबळे यांनी आभार व्यक्त केले. या व्याख्यान कार्यक्रमास भाषा व वाङमय संकुलातील सर्व सहायक प्राध्यापकांनी सहकार्य केले.
