सोलापूर: 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी सोलापूरच्या हर्षल साबळे या युवकाने आफ्रिका खंडातील सर्वोच्य शिखर माऊंट किलिमंजारो हे जवळ जवळ 19000 फूट उंच असलेले शिखर अवघ्या 46 तासात सर करून जागतिक विक्रम केला.त्यांची ही कामगिरी महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.त्यांच्या या कामगिरीची दखल महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतली आहे.हर्षल साबळे यांच्या विश्वविक्रमी कामगिरीचे कौतुक करत त्यांनी आपल्या मुंबई येथील निवास स्थानी वर्ल्ड रेकॉर्ड च्या प्रती सोबत सत्कार केला व पुढील कामगिरी साठी सदिच्छा दिल्या.
या उल्लेखणीय कामगिरीची दखल प्रतिष्ठीत मानले जाणाऱ्या ‘इंडिया रेकॉर्ड्स’ आणि ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ने घेतली आहे. हे शिखर सर करण्यासाठी 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागतो तेच आफ्रिकेतील माउंट किलिमंजारो हे सर्वोच्च शिखर अवघ्या 46 तासात सर करणारे हर्षल साबळे हे भारतातील पाहिले हेल्थ आणि फिटनेस कोच ठरले आहेत.तसेच महाराष्ट्रातील सर्वांत जलद गतीने हे शिखर सर करणारी पहिली व्यक्ती ते ठरले आहेत त्यांची हि कामगिरी फक्त सोलापूर साठी नसून संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. सोलापूरच्या मातीतून सर्वात जलद विक्रम केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
किलीमांजारो हे टांझानिया (आफ्रिका खंड) देशातील शिखर असून याची उंची समुद्रसपाटी पासून जवळपास 19000 फूट आहे. प्रचंड अवघड आणि इतक्या प्रचंड उंचीवर ऑक्सिजन ची कमतरता असलेले हे शिखर इतक्या कमी वेळात सर करण्याचं धाडस हर्षल यांनी दाखवले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्याविषयी असलेली जागरूकता व मुक्या प्राण्यांवर होत असलेल्या अत्याचारा बद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कडून मी केलेल्या विश्वविक्रमी कामगिरीची दखल घेतली ही माझ्यासाठी स्फूर्तीदायक क्षण आहे ही एक सुरुवात असून भविष्यात अशा प्रकारचे अनेक विश्वविक्रम मेहनतीच्या बळावर नक्की करेन असा माझा विश्वास आहे.
– हर्षल साबळे
(विश्वविक्रमवीर)- मुलाच्या विश्वविक्रमाची मुख्यमंत्री साहेबानं कडून दखल घेतली जाने हे आई म्हणून माझ्या साठी अभिमानाची गोष्ट आहे.भविष्यात यशस्वी वाटचाल अशीच कायम राहील असा माझा ठाम विश्वास आहे.
– मीना साबळे (आई)
- मुलाच्या विश्वविक्रमाची मुख्यमंत्री साहेबानं कडून दखल घेतली जाने हे आई म्हणून माझ्या साठी अभिमानाची गोष्ट आहे.भविष्यात यशस्वी वाटचाल अशीच कायम राहील असा माझा ठाम विश्वास आहे.