सोलापूर, दि.11- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (पेट-8) अर्ज करण्याच्या प्रक्रियेला दि. 13 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. विविध विषयांच्या 644 जागा असून त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विद्यापीठाच्या sudigitaluniversity.ac या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना 13 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर कॉमन पेपर 17 ऑगस्टला तर विशेष पेपर 18 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे. उत्तरपत्रिका 20 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल. त्या संदर्भात काही हरकती असल्यास 25 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येईल. अंतिम उत्तर पत्रिका 26 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात येईल. तर या परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांनी सांगितले.
ही परीक्षा पूर्णता ऑनलाइन पद्धतीने होणार असून परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांच्या हालचालीवर विशेष तंत्रज्ञानाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखे अंतर्गत जैवतंत्रज्ञान विषयासाठी-21, वनस्पतीशास्त्र- 15, रसायनशास्त्र- 25, सिविल इंजीनियरिंग- 3, इलेक्ट्रॉनिक्स- 1, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन-16, पर्यावरणशास्त्र-2, भूगोल-65, गणित- 3, यांत्रिक अभियांत्रिकी-20, सूक्ष्मजीवशास्त्र-4, औषधनिर्माणशास्त्र- 17, पदार्थविज्ञान-18, संख्याशास्त्र- 8 तर प्राणिशास्त्र विषयासाठी 21 जागा आहेत. मानव विज्ञान विद्याशाखे अंतर्गत प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्रसाठी 1, अर्थशास्त्र-5, इंग्रजी- 38, हिंदी- 56, इतिहास- 29, कन्नड-4, मराठी-95, तत्त्वज्ञान-4, राज्यशास्त्र 21, प्राकृत-4, मानसशास्त्र सहा तर समाजशास्त्र विषयासाठी सात जागा आहेत.
वाणिज्य व व्यवस्थापन अकाउंटन्सीसाठी 11 तर व्यवसाय अर्थशास्त्र विषयासाठी आठ जागा आहेत. शिक्षणशास्त्रला-58, ग्रंथालय व माहितीशास्त्र-9, पत्रकारिता व जनसंज्ञापन-1, शारीरिक शिक्षणशास्त्र विषयासाठी 41 तर समाजकार्य विषयासाठी एकूण सात जागा आहेत. संबंधित विषयानुसार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून पीएचडीच्या पूर्वपरीक्षेसाठी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.