सोलापुरात उष्णतेची लाट आली आहे. तापमानातील पारा दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. दोन दिवसापूर्वी 28 एप्रिल रोजी 43.7 अंश अशा तापमानाची सोलापुरात नोंद झाली होती हे तापमान राज्यात सर्वाधिक होते. यानंतर आज 44 अंश एवढे या हंगामातील सर्वोच्च तापमान नोंदविले. सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही झाली. त्यामुळे आजवर सोलापूर कधी कधी तापले हे जाणून घ्या येस न्युज मराठीच्या माध्यमातून. 9 मे 1988 साली सोलापुरात आजवरचे सर्वाधिक असे 46 अंश तापमान झाल्याची नोंद हवामान आहे. त्यानंतर 20 मे 2005 साली 45.1° एवढे तापमान होते. 30 एप्रिल 2008 साली 43.8 अशा तापमानाची नोंद झाली. तर दोन दिवसापूर्वी 28 एप्रिल रोजी 43.7 असे तापमान होते. मात्र आज पुन्हा सूर्य कोपला असून यावर्षीच्या हंगामातील सर्वाधिक अशा 44 अंश एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. सूर्य आग ओखत असल्यामुळे दुपारच्या वेळी सोलापुरातील रस्त्यावर तुरळ गर्दी दिसत होती. या उन्हामुळे सोलापूर हे ‘शोलापूर’ आहे की ‘सोलारपूर’ आहे असेच वाटू लागले आहे.