पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भू म पुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा इ १२ वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/ मार्च २०२४ चा निकाल ९२.२६ टक्के इतका लागला .
यात वाणिज्य विभागाचा निकाल ९४.८१ टक्के तर कला विभागाचा निकाल ८५.८८ टक्के इतका लागला असून महाविद्यालयात वाणिज्य व कला विभागातून भंडारी रेणुका नागेश हिने ८६.५०( ६०० पैकी ५१९)टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविले, द्वितीय क्रमांक म्हंता हंसिका हिरालाल ८५.५० (६०० पैकी ५१३ गुण) टक्के तर हाश्मी अरिशासामीन स.मुद्दसरअली ८४.६७ ( ६०० पैकी ५०८ , कला विभागात प्रथम क्रमांक) टक्के तृतीय क्रमांक मिळविले.
महाविद्यालयात कला विभागात भोसले प्राची चंद्रकांत ८३.५० % द्वितीय क्रमांक तर भोसले स्वाती चंद्रकांत ८१.३३% तृतीय क्रमांक आणि वाणिज्य विभागातून बगाडे संध्या रविंद्र ८३.६७% तृतीय क्रमांक मिळविले. १२ वी बोर्ड परीक्षेसाठी कला विभागातून एकूण ८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले पैकी ७३ उत्तीर्ण झाले तर वाणिज्य विभागातून २१२ विद्यार्थी प्रविष्ट झाले पैकी २०१ उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून एकूण प्रविष्ठ विद्यार्थींनी पैकी १६ विद्यार्थींनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे संस्थेचे विश्वस्त पांडुरंग काका दिड्डी व विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, उपाध्यक्ष प्रा श्रीनिवास कोंडी ,सचिव दशरथ गोप, सहसचिवा संगीताताई इंदापूरे ,खजिनदार नागनाथ गंजी व शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्याल व सर्व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागण्यासाठी प्राचार्या गीता सादूल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वी प्रयत्न केले.