सोलापूर : ३ जुन २०१२ रोजी जनकल्याण मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. सोलापुर या संस्थेचे एक छोटेसे वृक्ष सोलापुर येथे भारताचे माजी केंन्द्रीय गृहमंत्री सुशिलकुमारजी शिंदे यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद पुंडलिक हजारे व त्यांच्या सौभाग्यवती आशा राजेंद्र हजारे यांनी लावले. आज संस्थेला १२ वर्ष संपुर्ण होतात. या बारा वर्षा संस्थेच्या ५० हजार ग्राहकांच्या विश्वासावर एकुण २७ शाखाचा विस्तार केला आहे. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेची आर्थिक स्थिती एकुण ठेवी १८३.४३ कोटी रूपये। एकुण कर्ज १२३.५७ कोटी रूपये, वसुल भागभांडवल ५.५५ कोटी रूपये, गुंतवणुक ६३.८९ कोटी रूपये, एकुण व्यवसाय २०६.६३ कोटी रूपये, निव्वळ नफा १.०५ कोटी रूपये, संस्थेने सन २०२२. २०२३ या आर्थिक वर्षात १५ टक्के लाभांश दिलेला आहे. संस्थेने आज पर्यत १० हजार महिलांना स्वता:च्या पायावर उभे राहण्याकरीता रक्कम रु.5,000/- पासुन ते रू.1,00,000/- पर्यंतचे बचत गटाचे कर्ज वाटप केले आहे. जेष्ठ नागरिक स्वतंत्र सैनिक, फक्त दोन मुली असणा-या महिलांना, विधवा महिला, अपंग यांच्या करीता अर्धा टक्का ठेवीवर जादा व्याज दिले जाते. संस्थेच्या सर्व शाखा संपुर्ण संगणीकीकृत सी बी एस बैंकिंग सोयी सुविधा सह उपलब्ध आहेत. आर टि जी एस / एन ई एफ टी / एस एम एस / मोबाईल बैंकिंग / क्युआर कोड / संस्थेचे स्वता चे फोन पे अॅप या सर्व सुविधा संस्थेच्या ग्राहकांसाठी उपलव्ध आहेत. सन २०१६ च्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त सोलापुर जिल्हयातील अकरा तालुक्यातील अकरा आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसाच्या नावाने रक्कम रूपये 5,000/- च्या दाम दुप्पट ठेवी कुटुंबाच्या वारसाच्या नावे ठेवण्यात आली होती व दामदुप्पट झालेली ठेवीची रक्कम संस्थेचा २०२२ चा दशकपुती सोहळा दिनी “चला हवा येऊ द” या कार्यकमात आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना दामदुप्पट ठेवीची रोख रक्कम रु.10,000/- चे अकरा वारसांना वाटप केले. १० वी १२ वी परीक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या सभासद, खातेदार यांच्या पाल्यांचा गुणवंत विदयार्थी म्हणुन संस्थेकडुन दरवर्षी सत्कार केला जातो. ३ जुन २०२२ रोजी संस्थेचा दशकपुर्ती निमित्त सभासद, ठेवीदार खातेदार, हितचिंतक यांच्या करीता ” चला हवा येऊ दे” हा भव्य मोफत कार्यक्रम आयोजित केला होता १५ हजार लोकांनी हा कार्यक्रम अंत्यत आनंदाने पाहिला. हे सर्व शक्य झाले ते फक्त नी फक्त संस्थेचे ५० हजार विश्वासाचे ग्राहक यांच्या मुळेच या वर्षी जनकल्याण मल्टीस्टेटच्या तपपुर्ती निमित्त जनकल्याण फाऊंडेशनच्या वतीने जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराचे सोमवार दिनांक ३ जुन २०२४ रोजी सायं. ६.०० वा हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. सन २०१६ पासून समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ९८ मान्यवरांना जनकल्याण फाऊंडेशन तर्फे जनकल्याण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन २०२४ यावर्षी प्रथमच राज्यस्थरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात येत आहे.
यावर्षीचा जनकल्याण गौरव राज्यस्यरीय पुरस्कार
१) सहकार व आर्थिक क्षेत्रातील पुरस्कार बुलढाणा अर्बन को-ऑप केडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक
२) वाणिज्य व्यापार व उदयोग क्षेत्रातील पुरस्कार बालाजी अमाईन्सचे मॅनेजींग डायरेक्टर व हॉटेल बालाजी सरोवर सोलापुर चे संस्थापक अध्यक्ष डॉ राम रेड्डी
३) सामाजिक व आध्यात्मीक क्षेत्रातील पुरस्कार बाळासाहेब आनंदराव काशीद (पाटील), अध्यक्ष भंडारा डोंगर समिती, मावळ जि. पुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे जनकल्याण गौरव २०२४ या पुरस्काराचे स्वरूप मानाची शाल, फेटा, श्रीफळ मानपत्र व सन्मान चिन्ह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान होणार आहे.
या कार्यकमाचे पुरस्कार वितरण विठठल रुकमिणी मंदिर समिती पंढरपुर या देवस्थानचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवार चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे सर हे असणार आहेत. या कार्यकमाचे प्रमुख पाहुणे श्री सदानंद हजारे बांधकाम उदयोजक मुंबई व व्ही. पी. पाटील चेअरमन व्ही. पी. शुगर्स लि. तडवळ ता. अक्कलकोट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
संस्थेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक यांच्या करीता पुरस्कार सोहळया पूर्वी १ जुन २०२४ पासून ते ३ जुन २०२४ पर्यंत सायं ०६.०० ते ०९.०० वा. पर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र व संतसाहित्याच्या माध्यमातून निसर्ग, समाज, अर्थकारण आदी विषयांवर ” मोगरा फुलला “झी मराठी भक्ती चैनल वरील प्रसिध्द निरूपणकार ह. भ. प. गणेश शिंदे अहमदनगर हे तीन दिवस प्रबोधन करणार आहेत. सदरील मराठी संगीतमय कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यकम हा सर्वासाठी विनामुल्य खुला आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी केले आहे.