सोलापूर : ओम आर्ट्स तर्फे डॉ. संतोष पोटे रत्नाकर करंडक २०२२ ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यंदाच्या २०२२ च्या रत्नाकर करंडक एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांच्या साहित्यावर आधारित एकांकिका स्पर्धा सादर होणार आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर आणि कुडाळ अशा एकूण १२ केंद्रांवरती ही एकांकिका स्पर्धा होणार आहे. तसेच या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पुणे येथे बालगंधर्व नाट्यगृहात होईल असे संयोजक भूषण देसाई यांनी सांगितले. सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी आपल्या सोलापूर केंद्रावर रंगभूमी कलामंच येथे १ जुलै २०२२ शुक्रवार रोजी संपन्न होणार आहे. सोलापूर केंद्रावरती एकूण ६ एकांकिका सादर होणार आहेत असे संयोजकांनी सांगितले.