सोलापूर प्रतिनिधी दि 10 जून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) यांच्या वतीने ग्रामपंचायत गुळवंची येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात “वृक्षारोपण” करण्यात आले. बार्टी चे महासंचालक तसेच विभाग प्रमुख यांच्या संकल्पनेतुन, सर्वत्र covid-19 वाढता प्रादुर्भाव व प्राणवायू ऑक्सिजनची पडत असलेली कमतरता आणि वाढत असलेले प्रदूषण पाहता त्यासाठी फक्त एकच आवश्यक उपाय आहे तो म्हणजे पर्यावरण चे रक्षण करणे त्या अनुषंगाने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात दि. 5 जुन ते 20 जुन पर्यंत “वृक्षारोपण सप्ताह” साजरी करण्यात येत आहे.
याचे औचित्य साधून बार्टी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सौ.प्रणिता कांबळे यांच्या उपस्थितीत तालुका उत्तर-सोलापुर चे समतादूत श्री.यशपाल चंदनशिवे यांच्या नियोजनातुन गुळवंची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गावचे सरपंच श्री. विष्णू भोसले व उपसरपंच श्री.सागर राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पौळ,पोलिस पाटील तानाजी यादव , दिनेश जगताप, सुनिल तांबे, शिवाजी नवगिरे, कबीर शेख, अभिषेक पवार, अनिल बोराडे, अमोल बोराडे उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना शासकिय व समाजकल्याण खात्याच्या योजने ची माहिती दिली. सदर वृक्षारोपण दरम्यान करण्यात आलेल्या वृक्षाच्या संगोपन ची ग्वाही सुद्धा मान्यवरांनी दिली.