सांगली (सुधीर गोखले) – जिल्ह्यातील मिरजेचा कृष्णाघाट परिसर मिरज पासून जेमतेम काही किलोमीटर वर आहे पण या घाटाचे महत्व पुराणकाळापासून अधोरेखित झालेय. येथील असलेले प्राचीन मार्कंडेश्वराचे मंदिर हे तत्कालीन स्थापत्य शैलीचा अनेक सुंदर नमुना असून रामायण काळापासून या भागाला महत्व आहे खुद्द सीता माईने श्री शंकराची पिंड स्थापल्याचे येथील जाणकारांकडून बोलले जाते. अधिक मासातील सोमवार चे औचित्य साधून मिरजेतील कृष्णावेणी भक्तांनी महाआरतीचे आयोजन केले होते या आरतीमध्ये तब्बल अकरा जोड्यानी सहभाग घेतला मिरजेतील जेष्ठ पुरोहित श्री लव आठवले यांनी या आरतीचे पठण केले तर ओंकार शुक्ल यांनी या आरतीसाठी जमलेल्या भाविकांसमोर या ठिकाणचे कृष्णा नदीचे महत्व विशद करताना कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होत असून ती बंगालच्या महासागरामध्ये मिळते या दरम्यान ती अनेक तीर्थक्षेत्रांच्या भेटी घेत प्रवास करते काही ठिकाणी तिचे पात्र मोठे तर काही ठिकाणी लहान आहे.
या कृष्णा नदीला वेण्णा नदी ची जोड मिळाल्यामुळे तिला कृष्णावेणी असेही संबोधले जाते आणि दर वर्षी श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी येथे होणारा ‘कृष्णावेणी’ चा उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो तर अलीकडील काही वर्षांपासून मिरजेचे अधिपती श्रीमंत गोपाळराजे पटवर्धन यांच्या सहकार्याने मिरज कृष्णा घाटावर देखील आम्ही हा उत्सव साजरा करत असल्याचे श्री शुक्ल यांनी यावेळी सांगितले तसेच हि महाआरती या ठिकाणी आम्ही भरवत असून सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खाडे, शीतल पाटोळे, डॉ प्रशांत लोखंडे, रामलिंग गुगरी, उमेश कुरणे, सुनील मोरे यांच्या सहकार्याने या महाआरतीचे आयोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले.