सोलापूर – खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापूर शहरातील कृष्ठरोग रुग्णांच्या वसाहतीला (लेप्रसी कॉलनी) भेट देऊन तेथील रहिवाशांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी लेप्रसीग्रस्त रुग्णांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे, उपायुक्त रवी पवार आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
कुष्ठरोगग्रस्त रुग्णांच्या निवासाच्या समस्येवर तात्काळ उपाय म्हणून केंद्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत वसाहतीतील जीर्ण घरांचे नूतनीकरण आणि नवीन घरांचे बांधकाम करण्याच्या व रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या आणि रुग्णालय परिसराला तात्काळ वॉल कंपाऊंड बांधण्याच्या तसेच कुष्ठरोग वसाहत परिसरात कचरा वेळेत न उचलल्याने साचलेले कचऱ्याचे ढीग आणि त्यामुळे पसरणारी दुर्गंधी यामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत खासदार शिंदे कचरा उचलण्याच्या कचरा वेळेत उचलला जावा, यासाठी नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या.कुष्ठरोगग्रस्त रुग्णांना आधार कार्ड मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधून विशेष आधार कार्ड कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.


