कोल्हापूरातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालंय वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. ज्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झाले. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि 23 मे 2024 रोजी पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पाटील यांच्या डोक्यारा मार लागल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळं त्यांची प्रकृती खालावत गेली.