पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीसाठी ३ कोटीची मागणी आषाढी यात्रा आढावा बैठक
पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी येणारा प्रत्येक वारकरी हा व्हीआयपी आहे. वारकरी यांना केंद्रबिंदू ठेऊन वेळेत कामे पुर्ण करा. पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीसाठी ३ कोटी १५ लाख रूपयांची मागणी करणेत आली आहे. येणारी आषाढी यात्रा हरित व निर्मल वारी असेल अशा सुचना जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
पंढरपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आज आषाढी यात्रा 2023 अंतर्गत शासकीय आढावा व पालखी सोहळा प्रमुख यांचे बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक सरदेशपांडे, निवासी उप जिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगांवकर महाराज, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सोनाली बागडे, प्रमुख उपस्थित होते.
आषाढी यात्रा सोहळ्या पायी येणारे भाविक यांना चांगल्या सुविधा द्या. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते दुरूस्त करणे साठी संयुक्तिक पाहणी दौरा करा.
निर्मल वारी हेच ध्येय..!
……………….
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी प्रत्येक मुक्कामाचे गावासाठी १ हजार शौचालये तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रत्येक मुक्कामाचे गावा साठी ८०० शौचालयांची सुविधा करणेत येणार आहे.
हरित वारी व कचरा मुक्त वारी ..!
……………….
पाचही पालखी मार्ग हरित व कचरा मुक्त करणे साठी नियोजन करा. राष्ट्रीय महामार्ग झालेमुळे पालखी मार्गावर झालेली वृक्षतोड भरून काढण्यासाठी दुपटीने वृक्ष लागवडीचे नियोजन करणे येत आहे. वारकरी यांना सावली होईल असे नियोजन करा.
कचरा होणार नाही यासाठी भाविकांमध्ये जनजागृती करा. पालखी मार्गावरील सर्व गावा यात्रे पुर्वी स्वच्छ करा. यात्रा कालावधीत व त्यानंतर स्वच्छता मोहिम राबवा. वारकरी यांना संकलन केंद्र उपलब्ध करून द्या. हरित व कचरामुक्त वारी चे नियोजन करा. अशा स्पष्ट सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या.
पालखी मार्गावरील
ग्रामपंचायतींना तिर्थक्षेत्राचा दर्जा देणे साठी प्रस्ताव देणार – सिईओ स्वामी
…….. पाचही पालखी मार्गावरील गावांचा समावेश. अ,ब, क वर्गात करता येईल का यासाठी भाविकांची संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधा देतां येतील का याचा विचार करणेत येणार आहे.
पालखी मार्गावरील गावांसाठी ३ कोटी १५ लक्ष चा प्रस्ताव पाठविला असला तरी या मधून पायाभूत सुविधांना खुप कमी निघी मिळतो. या सर्व बाबींचा विचार करून पाचही मार्गावरील ग्रामपंचायतींना तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळणेसाठी प्रयत्न करणेत येत आहे. या मार्गावर भाविकांची संख्या लाखात आहे.
चंद्रभागेचे पावित्र्य टिकवून ठेवा ..!
…………….
मंदिर समिती व नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेवर भर देणेचे सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिले. नदीपात्रात असलेली शौचालया मधील मैला नदी पात्रात जाणार वाहून जाणार नाही या साठी नियोजन करा असे सांगून चंद्रभागेचे पावित्र्य राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी पालखी मार्गावरील ग्राम मध्ये देणेत येणारे सुविधा बाबत माहिती दिली. नगरपालिकेचे वतीने प्रशासन अधिकारी सुनील वाळुंजकर यांनी तर मंदिर समितीच्या वतीने देणेत येणारे सुविधा बाबत व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी माहिती दिली. व्यापारी संघटनेचे सत्यविजय मोहोळकर, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगांवकर महाराज यांनी रस्ते दुरूस्ती व दोन वेळा पालिकेने पाणी सोडणे बाबत मागणी केली. दिलीप गुरव यांनी गोपाळपूर जुना पुल व विष्णुपद मंदिर कडे जाणारा मार्ग दुरूस्त करणेची मागणी केली.
संत एकनाथ महाराज व संत जनाबाई व संत गजानन महाराज पालखी मार्गावर तात्पुरते शौचालय देणेची मागणी केली.
वारकरी बांधवांची सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणा तत्पर – ग्रामीण पोलिस अधिक्षक सरदेशपांडे
…………..
पालखी सोहळा आलेनंतर व गोपाळ काल्या पर्यंत पोलिस बंदोबस्त राहिल.वारकरी यांचे सुरक्षिततेसाठी व चोरी व इतर घटना रोखणे साठी सिसीटीव्ही व फिरती गस्त पथके राहतील. अशी माहिती ग्रामीण पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
भाविकांसाठी दोन लाखांचा विमा
…………..
पंढरपूर शहर व परिसरांत दहा किलोमिटर ते परिघात एखादे भाविकांचे निधन झालेस त्यांचे कुटूंबियास दोन लाख रूपये मदत देणे साठी वारकरी यांचा विमा उतरविण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पालखी सोहळ्यात समाज आरतीचे वेळेस स्वच्छता, शौचालयाचा वापर, कचरा मुक्ती साठी भाविकांचा सहभाग घेणे साठी महाराज मंडळी यांनी आवाहन करावे अशी सुचना मांडली.