• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्वामी गोविंददेव देव गिरी यांचे ”मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम – छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान

by Yes News Marathi
September 20, 2024
in इतर घडामोडी
0
स्वामी गोविंददेव देव गिरी यांचे ”मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम – छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे माजी कुलगुरु व रोटरीचे प्रांतपाल दिवंगत के. भोगिशयाना यांच्या स्मरणार्थ व्याख्यान आयोजित केले जाते. या वर्षी अयोध्या येथील श्री राम मंदीरचे कोषाध्यक्ष परमपुज्य स्वामी गोविंददेव देव गिरी जी हे मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम – छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान देतील. हे व्याख्यान रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता शिवस्मारक सभागृहात येथे होत असल्याची माहिती अध्यक्ष रोटे सीए सुनिल माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून सोलापूरकरांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

प्रोफेसर के. भोगिशयाना हे सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. 1960 मध्ये ते या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आणि 1983 पर्यंत म्हणजे सलग 23 वर्षे त्यांनी प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली १९८३ साली त्यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या कुलगुरू पदी नियुक्ती झाली आणि १९८६ पर्यंत त्यांनी कुलगुरू पदाचा कामकाज पाहिला. कुशल प्रशासक आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. शिक्षणाबरोबरच शिस्त, चारित्र्य आणि मूल्यांवरची श्रद्धा या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा यासाठी ते अविरत प्रयत्नशील राहिले. रेडक्रॉस च्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, रोटरी क्लबचे प्रांतपाल, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन च्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, कोल्हापूरच्या सायबर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, सोलापूरातील संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य पाहिले. अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे के भोगिशयाना यांच्या स्मरणार्थ गेल्या 20 वर्षांपासून विविध विषयांवर तज्ञ व्यक्तींची इंग्रजी मध्ये व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. आज पर्यंत टाईम्स् ऑफ इंडियाचे माजी संपादक – स्व. दिलीप पाडगांवकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु- डॉ. नरेंद्र जाधव, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉ. पंडित विद्यासागर, श्री. प्रकाश बंग, महाभियोक्ता, ऍड. श्री. आशुतोष कुंभकोणी, न्यायमुर्ती अजित शाह, डॉ. एन. एम. कोंडप, रोटरी चे आंतरराष्ट्रीय माजी अध्यक्ष राजा साबू, कल्याण बॅनर्जी, सौ रेखा शेट्टी, यतीन शहा, माजी सरन्यायधीश श्री उदय लळीत आदि नामवंत वक्तांचे विचार ऐकण्याचा लाभ सोलापूरकरांना मिळाला असल्याचे अध्यक्ष रोटे सीए सुनिल माहेश्वरी यांनी सांगितले. तरी सोलापूरकरांनी या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस सचिव ब्रिजकुमार गोयदानी, सीए राजगोपाल मिणियार, खजिनदार मितेश पंचमीया सह रोटे कालिदास जाजू, संदीप झवेरी, निलेश फोफलिया आदी उपस्थित होते.

Previous Post

सराईत गुन्हेगार सैपन शेख दोन वर्षांकरीता तडीपार

Next Post

दुर्मिळ अशा अधिवृक्क ग्रंथीच्या गाठिवर दुर्बिणीव्दारे शस्रक्रिया केली यशस्वी

Next Post
दुर्मिळ अशा अधिवृक्क ग्रंथीच्या गाठिवर दुर्बिणीव्दारे शस्रक्रिया केली यशस्वी

दुर्मिळ अशा अधिवृक्क ग्रंथीच्या गाठिवर दुर्बिणीव्दारे शस्रक्रिया केली यशस्वी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group