येस न्युज नेटवर्क : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला केवळ सहा पदके जिंकता आली. यामध्ये एकाही सुवर्ण पदकाचा समावेश नव्हता. मात्र, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी सुवर्ण पदक जिंकता आले. अवनी लेखरा हिने सोनेरी कामगिरी करत तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल एकेरीत सुवर्ण पदक पटकावले अन् अवनी देशाच्या अपेक्षांवर खरी उतरली.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी एका सुवर्ण पदकासह दोन पदके जिंकणारी नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी आणखी एक सुवर्ण पदक जिंकून कमाल केली. तिने स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी १० मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले. अशा प्रकारे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने शानदार सुरुवात केली आहे. याशिवाय भारताच्या मोना अग्रवालने याच स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.