नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश..
प्रभाग 26 मधील विष्णुपुरी येथे गेल्या 25 ते 30 वर्षापासून त्या काळातील राजकीय नेते फक्त मतदान पुरते नगरात यायचे व खोटे नाटे आश्वासन देऊन निघून जायचे. व परत पाच वर्षांनीच पावसाळ्यातील छत्रीप्रमाणे उगवायचे नागरिकांनी वेळोवेळी नागरिक समस्या बाबत पाठपुरावा करून थकले होते.
२०१७ साली सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यानंतर प्रथम विष्णुपुरातील पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज,मेन रस्ता,अंतर्गत रस्ते प्राधान्याने करून दिले होते.तसेच विष्णुपुरी नगरातील गणेश मंदिर यांचे सुशोभीकरण करून देण्यात आले होते.
उर्वरित नऊ ते दहा घरांसाठी पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे तेथील नागरिकांनी सातत्याने नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्याकडे निवेदने दिले होते. त्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते त्यामुळे शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन काम मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही गेल्या 20 ते 25 वर्षापासून सदर नगरामध्ये राहत असून आम्हाला कुठल्याच सुविधा मिळत नव्हत्या. आमचे अमेरिकेतील पाहुणे नगरात आल्यानंतर आम्हाला विचारायचे की तुम्ही टॅक्स भरूनही तुमच्या सुविधा का होत नाही आम्ही एखाद्या खेडेगावात आल्यासारखा भास होत आहे असे सांगायचे त्यामुळे आम्ही लाजीरणे व्हायचो.
परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यानंतर प्राध्यान्याने आमचे नगरातील पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज, मेनरोड, अंतर्गत डांबरी रस्ते, दिवाबत्ती, गणेश मंदिराचे सुशोभीकरण कामे करून आमच्या नगराचा कायापालट केला आहे. अमेरिकेतील आमचे पाहुणे परत आमच्या नगरात आल्यानंतर झालेल्या सोयी सुविधा बघून नगरसेवक असावा तर असा असावा अशा प्रतिक्रिया दिल्याने आमचे मन गर्वाने उंचावले आहे अशा जनतेसाठी धडपडणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या व उर्वरित पाण्याच्या पाईपलाईन साठी पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल आभार मानले.
त्याप्रसंगी विश्वास जाहागीरदार काका, सुहास कुलकर्णी, बाळासाहेब खटाळ, शुभम चिकोळी, शिवानंद पाटील, सिद्धाराम बिराजदार, गुरु आवटगी, पोतणीस काका, रोहित रुपनर, सचिन शिंदे, शुभम बिराजदार, कुंभार काका,दुबे, कुंभार काकू. कुलकर्णी, चीकाळी तसेच भाजपचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, ठेकेदार सोनी हे उपस्थित होते.