सोलापूर – सीसीट (CSEET) परीक्षेचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला असून हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही उत्तम कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे. एकूण १६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.
परीक्षेत शाद मुट्टवल्ली याने २०० पैकी १८३ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर कृष्णा अतनूरे (१७८), वैष्णवी मोरे (१७६), सनत झमवर (१७२), अभिनव पोलास (१६७), तनिष्का दुस्तकर (१६६), प्रीतम बोगा (१५६), अमृता ढगे (१५६), धनश्री जिल्ला (१५५), सुष्मिता महिंद्रकर (१५४), रिया दुस्तकर (१४७), अभिषेक भीमनपल्ली (१४४), राणी दोडमिसे (१३३), वृंदा वनकुदरे (१२३), वृशाली वाले (११७) आणि कुसुम अवतानी (११२) यांनी यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एस. के. शहा सांगतात,“विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. यामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले.”
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे समस्त विश्वस्त, अॅड. सोनाली वेद, डॉ. सामीना रंगरेज
सर्व प्राध्यापक, समन्वयिका सारिका महिंद्रकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
प्रियांका अंबुरे यांनी आभारप्रदर्शन केले.
या यशामुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक क्षेत्रातले योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी नवे क्षितिज खुले झाले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केल्या.