सोलापूर: राज्यातील अनेक गरजू रुग्णांना अद्ययावत उपचार देणारे प्रमुख सरकारी रुग्णालय असा लौकिक असलेल्या ससून सर्वो पचार रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली असून तर अधिष्ठाता पदाची जबाबदारी सांभाळत असलेले डॉ. विनायक काळे यांच्याकडे रुग्णालयातील मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सोलापूरच्या वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या अधिष्ठातापदी डॉ. सुधीर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे..