जनतेचा कौल – यंदा आडम मास्तरांना विधानसभेत पाठवणारच!
सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुक हाकेच्या अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्तापिपासू बनली आहे.जनतेच्या हिताला मूठमाती दिली आहे.त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी आज जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फर्तपणे कौल दिलेला आहे याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे.त्यास मी बांधली राहीन असे नम्रपणे ऋण निर्देश व्यक्त केले.
जगातील एकमेव असे ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात साकार झाला. परंतु केंद्र सरकारच्या धोरणामुळे रे नगरच्या सभासदांना २ लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे कर्ज आणि व्याजाचा बोजा थेट सभासदांवर पडला आहे. म्हणून हा अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी व वाढीव २ लाख रुपये अनुदान मिळावे. रे नगरच्या पायाभूत सुविधांकरिता १२५ कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावे. अत्यल्प दरात सौरऊर्जा प्रकल्प राबविणे. या मागणी करिता बुधवार दि. २६ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता अक्कलकोट रोड, महालक्ष्मी मंदिर लगत कै. बोमड्याल सभागृह येथे माजी नगरसेवक कॉ.व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी लढवावी की नाही ? यासाठी खुलेआम जनतेचा कौल घेण्यात आला.
यावेळी पुष्पा येमुल – आडम मास्तर यांनी जनतेसाठी खूप मेहनत घेतात त्यांना आमदार करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह प्रयत्न करते.
संध्या कांबळे – मास्तरांनी गल्ली ते दिल्ली वारी करून घरकुल योजनेचे लाभ मिळवून दिले.अनेक प्रश्न सोडवले, गोरगरिबांना मदत केले अशा व्यक्तीला विधानसभेत पाठवले पाहिजे.
चंद्रकला मोरे – मास्तरांनी लोकसभेला प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिले व त्यांना निवडून आणण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे यंदाच्या विधानसभेत मास्तरांना ही आमदार करणार.
प्रमिला सरळगी – मास्तर लढणारा माणूस आहे.त्यांच्या मुळे मला घर मिळाले आहे.मी त्यांचे उपकार कधीच विसणार नाही.
अनिल द्यावरशेट्टी – आमच्यावर 2 लाख कर्जाचा बोजा आहे.ते कमी करा.आम्ही तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची आहे सिद्धेश्वर मंजुळकर – आमच्या साठी घरकुल दिलात पेन्शन योजना लागू करा.
यावेळी सिद्धेश्वर मंजूळकर , अनिल द्यावरशेट्टी,सुजाता
विलास सरळगी,शालन तेलतुंबडे,उमा धोत्रे,मंदाकिनी कस्सा,संध्या कांबळे,पुष्पा येमुल,रेखा त्रिमल आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मत व्यक्त केले. यानंतर कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे दिलेल्या कौलाचे स्वागत करत सर्वांचे जाहीर आभार मानले.
प्रास्ताविक करताना एम.एच.शेख म्हणाले की, येणारी विधानसभा जनतेने हातात घ्यावी.धर्मांध आणि खोटी आश्वासने आणि खोटी स्वप्ने विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आणि आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कॉम्रेड आडम मास्तरांना विधानसभेत पाठवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.याचा निर्धार करा असे आवाहन केले.
यावेळी व्यापीठावर माकपचे जिल्हा सचिव ॲड.एम.एच. शेख , राज्य समिती सदस्य नसीमा शेख,सिद्धप्पा कलशेट्टी, रे नगर फेडरेशन चे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, कुरमय्या म्हेत्रे, सुनंदा बल्ला, शकुंतला पानिभाते,लिंगव्वा, सोलापूरे,मुरलीधर सुंचु, ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती. या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभर प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी केले. यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथक
शाहिरांनी क्रंतीगीते सादर केले.
वीरेंद्र पद्मा, बापू साबळे,किशोर मेहता, बाबू कोकने, बाळकृष्ण मल्याळ, अभिजीत निकंबे, दीपक निकंबे , सलीम मुल्ला, गजेंद्र दंडी, नागेश म्हेत्रे, दत्ता चव्हाण,अशोक बल्ला, शाम आडम, सिद्राम गडगी, पांडुरंग म्हेत्रे, विजय हरसुरे,बालराज म्हेत्रे, अंबाजी दोंतुल, अंबादास बिंगि,बालाजी गुंडे,प्रवीण आडम, सिद्राम गडगी, संजय ओंकार, किशोर गुण्डला, युसुफ शेख,प्रशांत विटे, शिवानंद श्रीराम, श्रीनिवास तंगडगी, प्रकाश कुरडकर ,गोपाळ जकलेर, अनिल घोडके,विजय मरेडी,प्रदीप मरेडी,अंबादास गडगी, मल्लिकार्जुन बेलीयार, तबसूम शेख,अकील शेख, इलियास सिद्दीकी,विद्या चंद्री,प्रिया कोतलापुरे, रहिसा शेख, प्रकाश शेंडगे,निकिता गोने,मल्लेशम कारमपुरी, असिफ पठाण,रवींद्र गेंट्याल आदींनी परिश्रम घेतले.