सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात २२ जून रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ८६ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या एकोणीस व्यक्तींना ९,५०० रुपये दंड करण्यात आला. शहर वाहतूक शाखेने २८४ व्यक्तींना ७३ हजारांचा दंड केला.त्याचप्रमाणे विना मास्क फिरणाऱ्या ८ व्यक्तींवर कारवाई करून शहर वाहतूक शाखेने चार हजार रुपये दंड केला आहे.