“बिझनेस असोसिएट कोर्स” प्रमाणपत्र वितरण समारंभ सेवा फाउंडेशन, राह फाउंडेशन आणि एंजेल वन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न
सोलापूर – सेवा फाउंडेशन, राह फाउंडेशन आणि एंजेल वन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बिझनेस असोसिएट कोर्स” यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ दिनांक 18 जुलै 2025 रोजी सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात एकूण 50 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.



या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत नलावडे (वर्ग २ अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालय, सोलापूर), तृष्णा गायकवाड (यंग प्रोफेशनल, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालय, सोलापूर) आणि शुभम खरात (वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, राह फाउंडेशन, मुंबई) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सेवा फाउंडेशनच्या केंद्र व्यवस्थापक मनिषा आनंद वाघमारे यांच्या प्रस्ताविकाने झाली. सूत्रसंचालन प्रशांत गर्गे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी शीतल कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमामध्ये सेवा फाउंडेशन, राह फाउंडेशन आणि एंजेल वन यांनी संयुक्तपणे स्थानिक युवकांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, भविष्यात असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.