येस न्युज मराठी नेटवर्क ; माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मोठी जबाबदारी दिली आहे. प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून निवडून आल्यापासून भाजपा पक्षाची भूमिका व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विकास प्रभागातील प्रत्येक घरात पोचविला होता.त्यामुळे नागरिकांच्या मनात भाजप पक्षाविषयी आदर निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु स्थानिक नेते त्यांना विश्वासात घेत नसल्यामुळे त्या नाराज होऊन BRS पक्षात प्रवेश केला होता. परंतु सोलापूर जिल्ह्यातील BRS पक्षाकडून कुठलाही प्रतिसाद येत नसल्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या.
दिनांक 8/11/2023 रोजी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षश्रेष्ठीने त्यांना बोलवण्यात आले व त्यांची मनधरणी करून त्यांची नाराजी दूर केली व त्यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघ परिवार, यांचे इमानदारी, पारदर्शक,केलेल्या कामाची पावती म्हणून दिलेली जबाबदारी आणखीन जोमाने करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असले बाबत सांगितले व पक्षश्रेष्ठीचे मनापासून आभार मानले.