सोलापूर: ए. जी. पाटील पॉलिटेक्निक येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांकरीता “भरारी-२५” हा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या बक्षीस समारंभामध्ये शैक्षणिक वर्षातील सर्व विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व १०० पैकी १०० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच खेळ आणि विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये प्राविण्य व बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
यावर्षी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील पृथ्वीराज लेंगरे, शिवानंद पटणे, मनीष मारीचेर्ला, समर्थ अनुभुले व समर्थ कलबुर्गी या विद्यार्थ्यांनी डिपेक्स-२०२५ या प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला म्हणून सर्व विद्यार्थ्यांना व प्रोजेक्ट गाईड प्रा. एस ए बोगा यांना गौरवण्यात आले.
याप्रसंगी प्रत्येक विभागातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचा पृथ्वीराज लेंगरे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाची शिफा शेख, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अलफान शेख, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाची स्नेहा जाधव व मेकॅनिकल इंजिनिअरिंगची तृप्ती सोमनाथ; तर सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग व सर्वोत्तम कर्मचारी सी एस ढेपे यांनाही मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंजि. जगदीश मारीचेर्ला हे होते. संस्थेचे विश्वस्त मा रविंद्रजी आडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले; तसेच ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. व्हि. पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एस ए पाटील, उपाध्यक्ष एस एस पाटील, कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम ए चौगुले व उपप्राचार्य एस के मोहिते यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रम प्रसंगी शैक्षणिक समन्वयक एस. एन. गवंडी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम. एम. कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एन. बी. पवार, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख टी. एल. पाटील, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. एस. लिगाडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख एस. आर. बागबान, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी व प्रथम वर्ष इन्चार्ज व्ही. आर. आवटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवंडी यांनी केले तर बक्षीस वाचन पवार यांनी केले. आवटे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.