सन 2024-25 साठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राजा सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्रपाली संस्थेचे आधारस्तंभ अमोल वामने, संस्थापक पवन थोरात यांच्या वतीने रुपाभवानी उद्यान याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी बशीर शेख हे होते.
या बैठकीसाठी RPI चे नेते राजेश उबाळे,अजित गायकवाड,सुशील सरवदे,शिवम सोनकांबळे, शहर अध्यक्ष अतुल नागटिळक,युवा उद्योजक संदीप दुगाने,उमेश उबाळे,किशोर इंगळे,माजी नगरसेवक रमेश व्हटकर,नागेश जाधव,संजू गायकवाड,सुजित अवघडे,सुहास सावंत आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या नूतन अध्यक्ष पदी मंगेश कांबळे यांची तर कार्याध्यक्ष पदी संदीप इंगळे यांची निवड करण्यात आली.
इतर पदाधिकारी…
अध्यक्ष – मंगेश कांबळे.
उपाध्यक्ष – जीवन भगत.
खजिनदार – सतीश गायकवाड
सह खजिनदार – प्रमोद वाघमारे
कार्याध्यक्ष -संदीप इंगळे,अजय कांबळे.
सेक्रेटरी – प्रशांत गायकवाड
सह सेक्रेटरी – आदित्य साबळे
मिरवणूक प्रमुख – रेवण इंगळे,शंकर गोणी,बाबू घागरे,गौतम कांबळे,बाबू शिंदे,अशोक कसबे, संजय थोरात, लहू कसबे,सचिन बोराडे..
या बैठकीसाठी संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.