• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे

by Yes News Marathi
February 9, 2022
in इतर घडामोडी
0
राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा – कृषीमंत्री दादाजी भुसे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, दि. 9 : राज्यात एकाच ठिकाणी फुले, फळे व भाजीपाला तसेच रोपे, कलमे विक्री सुविधा केंद्र (नर्सरी हब) असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या रोपवाटिकाधारकांसाठी त्यांच्याकडील फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इ. पिकांच्या कलमे-रोपे विक्रीसाठी एकत्रित सुविधा निर्माण व्हावी यासाठी राज्यात ‘नर्सरी हब’ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून कृषी विद्यापीठांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

        मंत्रालयात राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, कृषी आयुक्त धीरज कुमार, रोपवाटिका उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

        राज्यातील विभागानुसार पीक पद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठांनी प्रायोगिक तत्वावर नर्सरी हब सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. अशी सूचना देऊन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश भुसे यांनी दिले.

        कृषीमंत्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती इ. फलोत्पादन पिकांच्या विविध वाणांची कलमे-रोपे एका ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन निवड करता येईल. तसेच विशिष्ट वाणाच्या खरेदी-विक्रीतील किंमतीचा फरक कमी होऊन अवास्तव नफेखोरीला आळा बसून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यामुळे लघुउद्योगास चालना, रोजगार निर्मितीमध्ये वाढ, शोभीवंत फुले-फळे निर्यात वाढून देशाच्या परकीय चलनवाढीस मदत होईल, असेही भुसे यांनी सांगितले.

Previous Post

रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी

Next Post

सोलापूर शहरात जागोजागी स्पीडब्रेकर आणि खड्डेच खड्डे…

Next Post
सोलापूर शहरात जागोजागी स्पीडब्रेकर आणि खड्डेच खड्डे…

सोलापूर शहरात जागोजागी स्पीडब्रेकर आणि खड्डेच खड्डे...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group