मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांकडून विधानसभेत 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागवार मोठ्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनं शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. सोबतच आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?” राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे बोलत होते.