येस न्युज मराठी नेटवर्क : बॉलीवूड आणि टीव्ही जगतासाठी एक धक्कादायक बातमी समोर आलीय. अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अनुपम श्याम यांचं निधन झालं आहे. मन या लोकप्रिय मालिकेला त्यांनी दिलेला आवाज आणि प्रतिज्ञा या मालिकेमधील ठाकुर सज्जन सिंह या दोन गोष्टींमुळे अनुपम यांनी घराघरात ओळख निर्माण केली होती. मागील बऱ्याच काळापासून ते आजारी होते. रविवारी सांयकाळी त्यांचं निधन झालं.
मागील काही दिवसांपासून अनुपम यांच्या प्रकृतीसंदर्भातील बातम्यांमुळे ते चर्चे होते. त्यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी अनुपम यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केले होता. मात्र उपचारांनंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते.