सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष तथा आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी नुकत्याच जाहीर केल्या. यामध्ये उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी तिन्हे येथील राम जाधव यांची निवड करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या तिन्हे गाव हे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण झाले आहे. त्यामुळे आ सुभाष देशमुख यांनी तिन्हे येथे अधिक लक्ष दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच राम जाधव यांची राजकीय वाटचाल सुरु असून भविष्यात उत्तर सोलापूर तालुक्यात भाजपाची ताकद वाढावी यासाठीच ही निवड करण्यात आली आहे.